शैक्षणिक संकुल व उपक्रम

र.जि.म.ज्ञा. समाज मुंबई संचालित शाळा, कौशल्य विकास केंद्रे आणि नियोजित प्रकल्प

र.जि.म.ज्ञा.समाज मुंबई संचालित मुख्य उपक्रम

१. बाल विकास विद्या मंदिर
२. RJMDS English School
३. Comet Computer Academy
४. रत्नागिरी शैक्षणिक संकुल प्रकल्प
मराठी माध्यम (स्थापना १९६७)

बाल विकास विद्या मंदिर (जोगेश्वरी)

विभाग: पूर्व प्रार्थमिक विभाग, प्रार्थमिक विभाग, व माध्यमिक विभाग (शिशुवर्ग ते इ. १० वी पर्यंत दर्जेदार शिक्षण).

पूर्व प्राथमिक विभागाच्या पहिल्या मुख्याध्यापिका सौ. मंगला विष्णू शिंदे, प्राथमिक विभागाच्या पहिल्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली मुळ्ये आणि माध्यमिक विभागाचे पहिले मुख्याध्यापक कै. श्री. सुमन चोगले (एल.एल.बी., बी.एड.) यांनी शाळेला प्रगतीपथावर नेले. श्री. चोगले सरांनी निवृत्तीच्या वेळी मिळालेली सर्व रक्कम रु. ७,१४,५५१/- शाळेस देणगी दिली, ज्यातून 'चोगले सभागृह' बांधण्यात आले. शाळेच्या सभागृहाला चौगुले सभागृह हे नाव देण्यात आले आहे.

मुख्याध्यापिका डॉ. सौ. अपेक्षा खामकर यांच्या कारकिर्दीत कु. मयुरी कदम ही १० वीला मराठी विभागातून मुंबईमध्ये पहिली आली (विद्यमान मुख्याध्यापिका सौ. नीला वर्तक या तेव्हा मराठीच्या शिक्षिका होत्या). दि. ०१/१२/२०२३ पासून श्री. जगदीश सूर्यवंशी हे मुख्याध्यापक असून मार्च २०२५ व मार्च २०२६ या दोन्ही वर्षी दहावीचा शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला आहे.

इंग्रजी माध्यम

RJMDS English School

Sections: Pre-Primary Section, Primary and Secondary.

काळाची गरज लक्षात येऊन आणि पालकांचे पाऊल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत असल्याचे पाहून संस्थेने जोगेश्वरीतील पालकांच्या आग्रहाखातर RJMDS English School सुरू केले.

या इंग्लिश स्कूलला पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, या शाळेचा दहावीचा (SSC) निकाल दरवर्षी सातत्याने १००% लागतो. शैक्षणिक, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा व सांस्कृतिक अशा सर्वच आघाड्यांवर ही शाळा नेत्रदीपक प्रगती करत आहे.

सातत्याने १००% निकालाची उज्ज्वल परंपरा राखणारी जोगेश्वरीतील अग्रगण्य शाळा.

संस्थेने चालवलेले प्रकल्प (१ ते ८)

१

बाल विकास विद्या मंदिर

पूर्व प्रार्थमिक विभाग, प्रार्थमिक विभाग, व माध्यमिक विभाग

२

RJMDS English School

Pre-Primary Section, Primary and Secondary

३

Comet Computer Academy

विभागातील सर्वं विद्यार्थ्यांकरिता कॉम्पुटर प्रशिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे.

४

स्वरसाधना संगीत अकॅडेमी

विभागातील सर्वं विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे.

५

कराटे व मलखांब

विभागातील सर्वं विद्यार्थ्यांकरिता कराटे व मलकखांब प्रशिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे.

६

नृत्यकला प्रशिक्षण वर्ग

सोमवार, बुधवार, व शुक्रवार या दिवशी शालेय विद्यार्थ्यांकरिता नृत्यकलेचे प्रशिक्षण दिले जाते

७

विद्यार्थी विकास निधी

गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते.

८

योगासन व ब्रह्मविद्या वर्ग

शाळा व शाळेच्या परिसरातील पालक व स्थानिक नागरिकांना अंबिका योग कुटीरच्या माध्यमातून मोफत योगासनाचे वर्ग व एकाग्रतेसाठी ब्रह्मविद्या वर्ग उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

भविष्यातील नियोजित प्रकल्प

१. रत्नागिरी (कोळंबे) शैक्षणिक संकुल प्रकल्प

संस्थेने मुक्काम कोळंबे - रत्नागिरी येथे शैक्षणिक प्रकल्प उभारण्यासाठी तीन (३) एकर जागा खरेदी केली आहे. लवकरच या ठिकाणी शैक्षणिक प्रकल्पाचा शुभारंभ होईल.

२. ज्युनियर कॉलेज व प्रकल्प

जोगेश्वरीतील जनता व त्यांचे पाल्य यांच्याकरिता ज्युनियर कॉलेज सुरू करणे.