८ ऑक्टोबर १९६२ पासून सुरू झालेला शैक्षणिक व सामाजिक उत्कर्षाचा गौरवशाली प्रवास[span_115](start_span)[span_115](end_span)[span_116](start_span)[span_116](end_span)
गिरगाव आणि गिरण गावातील म्हणजे लालबाग परळ विभागात राहणारे आणि विशेषता कोकणातील काही शिक्षण प्रेमी समाज बांधव यांना एकत्रित करून कै. विना शिंदे यांनी ८ ऑक्टोबर १९६२ रोजी गिरणगावातील गायवाडीत आपल्या राहत्या घरी रत्नागिरी मराठा ज्ञाति समाज मुंबई संचालित या संस्थेची स्थापना केली.[span_119](start_span)[span_119](end_span)[span_120](start_span)[span_120](end_span) संस्थेच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार विस्तारत गेला. आणि अल्पावधीतच संस्थेचे रूपांतर रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई संचालित असे झाले.[span_121](start_span)[span_121](end_span)[span_122](start_span)[span_122](end_span)
सामाजिक कार्याबरोबर शैक्षणिक आघाडीवर कार्य करण्यासाठी जोगेश्वरीची निवड करून कै.भाऊ, प्रभाकर विश्वासराव, कै.पालकर गुरुजी, श्री शंकरराव पवार यांनी आपल्या समाज बांधवांच्या मदतीने पुढे १९६७ साली शाळेच्या रूपाने या संस्थेला सुवर्ण युगात वाटचाल करण्याची संधी दिली.[span_123](start_span)[span_123](end_span)[span_124](start_span)[span_124](end_span) शाळा सुरू करण्यात मा. श्री प्रभाकर विश्वासराव यांचे योगदान फार महत्त्वाचे होते याचे कारण त्यांच्या पुढाकाराने कै. भाऊ व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने बाल विकास विद्या मंदिर ही शाळा नावारुपास आली.[span_125](start_span)[span_125](end_span)[span_126](start_span)[span_126](end_span) यामागे श्री प्रभाकर विश्वासराव, कै. विना शिंदे व सहकारी मित्र समाज बांधव, आमचे गोरगरीब पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे फार मोठे कष्ट आहेत.[span_127](start_span)[span_127](end_span)[span_128](start_span)[span_128](end_span)
संस्थेने जोगेश्वरीत सुरू झालेल्या कार्याचा हळूहळू विकास झाला तो शाळेच्या विकासाबरोबरच नवीन समाज बांधव या संस्थेशी जोडले गेले. शाळेची प्रगती होत असतानाच संस्था ही मोठी होत गेली. आज शाळेला नवीन दिशा प्राप्त झालेली आहे.[span_129](start_span)[span_129](end_span)[span_130](start_span)[span_130](end_span) जी मंडळी या संस्थेत आली त्यातील प्रत्येकाने ही आपली संस्था आहे, आपला समाज आहे आणि त्याकरिता सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. हे ध्येय उराशी बाळगून प्रत्येक कार्यकर्त्यांनी शाळा व संस्था यांच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले.[span_131](start_span)[span_131](end_span)[span_132](start_span)[span_132](end_span) आपल्याला समाजाने एक व्यासपीठ मिळवून दिलेले आहे याचा आपण पुरेपूर लाभ घेतला पाहिजे, हे सुद्धा सर्वांनी जाणले यामुळेच आजची ही शाळा व संस्थेची खरी प्रगती होत आहे.[span_133](start_span)[span_133](end_span)[span_134](start_span)[span_134](end_span)
अध्यक्ष
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई[span_138](start_span)[span_138](end_span)[span_139](start_span)[span_139](end_span)
कार्याध्यक्ष
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई[span_142](start_span)[span_142](end_span)[span_143](start_span)[span_143](end_span)
सरचिटणीस
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई[span_148](start_span)[span_148](end_span)[span_149](start_span)[span_149](end_span)
अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई[span_151](start_span)[span_151](end_span)[span_152](start_span)[span_152](end_span)[span_153](start_span)[span_153](end_span)
गिरगाव आणि गिरण गावातील म्हणजेच लालबाग परळ विभागात राहणारे विशेषतः कोकणातील काही शिक्षणप्रेमी समाजबांधव यांना एकत्रित करून कै.वि.ना.शिंदे यांनी ८ ऑक्टोबर १९६२ रोजी गिरगावांतील गाय वाडीत आपल्या राहत्या घरी रत्नागिरी तालुका मराठा ज्ञाति समाज, मुंबई या संस्थेची स्थापना केली.[span_154](start_span)[span_154](end_span)
संस्थेच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार विस्तारत गेला आणि अल्पावधीतच संस्थेचे रूपांतर रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई असे झाले. सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक आघाडीवर कार्य करण्यासाठी जोगेश्वरी ची निवड करून कै. भाऊ, प्रभाकर विश्वासराव, कै. पालकर गुरुजी, श्री शंकराव पवार यांनी आपल्या समाज बांधवांच्या मदतीने पुढे १९६७ साली शाळेच्या रूपाने या संस्थेला सुवर्ण युगात वाटचाल करण्याची संधी दिली. शाळा सुरू करण्यात मा. श्री. प्रभाकर विश्वासराव यांचे योगदान फार महत्त्वाचे होते. यांचे कारण त्यांच्या पुढाकाराने कै. भाऊ व त्यांचे सहकारी यांनी बाल विकास विद्या मंदिर शाळा स्थापन केली. आज ही शाळा नावारुपास आली. यामागे मा. श्री. प्रभाकर विश्वासराव, कै. वि.ना. शिंदे व सहकारी मित्र, समाजबांधव, आमचे गोर-गरीब पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे फार मोठे कष्ट होते. संस्थेने जोगेश्वरीत सुरू केलेल्या कार्याचा हळू-हळू विकास झाला तो शाळेच्या विकासाबरोबरच नवीन समाजबांधव या संस्थेशी जोडले गेले. शाळेची प्रगती होत असताना संस्था ही मोठी होत गेली. आज शाळेला नवीन दिशा प्राप्त झालेली आहे. जी मंडळी या संस्थेत आली त्यातील प्रत्येकाने ही आपली संस्था आहे, हा आपला समाज आहे आणि त्याकरता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत हे धैर्य उराशी बाळगून या प्रत्येक कार्यकर्त्याने शाळा व संस्था यांच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले. आपल्याला आपल्या समाजाने एक व्यासपीठ मिळवून दिलेले आहे याचा आपण पुरेपूर लाभ घेतला पाहिजे हे सुद्धा सर्वांनी जाणले आणि त्यामुळेच आज ही शाळा व संस्थेची प्रगती होत आहे.[span_155](start_span)[span_155](end_span)
समाज बांधवांबरोबरच आमच्या सर्वच पालकांनी, शिक्षणप्रेमी जनतेने, विविध संस्था, विविध न्यास यांनी सुद्धा आम्हाला आमच्या प्रत्येक प्रकल्पाच्या अमलबजावणी करिता वेळो-वेळी मदत केली आणि त्याच बरोबर आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा तेवढेच किंबहुना त्याहून अधिक सहकार्य केले, मग ते आर्थिक असो वा सामाजिक असो, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून या शाळेच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले.[span_156](start_span)[span_156](end_span)
शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सुखसोई प्राप्त व्हाव्यात या करिता संस्थेने प्राधान्य देऊन इतर शाळेत उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात भाग घेता यावा, मग ते विज्ञान प्रदर्शन असो, विविध क्रीडा स्पर्धा असो आंतरशालेय संगीत वा चित्रकला स्पर्धा असो, प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थी आणि शिक्षकांना वेळो-वेळी प्रोत्साहन देण्यात येत आहे आणि उद्याचा समाज निर्माण करण्याची सामाजिक बांधिलकी पार पडण्यात सुद्धा संस्था अग्रेसर आहे. विद्यार्थी आणि त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा प्रमुख उद्देश समोर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही वेळो-वेळी केलेला आहे.[span_157](start_span)[span_157](end_span)
शाळा मोठी होत असतानाच पालकांचे पाऊल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळू लागले आणि त्यामुळे संस्थेने इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्याचा विचार केला व तो २००४ मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून पूर्ण केला. परंतु हे सर्व करत असतांना अजून किती तरी आव्हाने समोर आहेत, नवीन प्रकल्प समोर आहेत, त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जोगेश्वरीतील जनता व त्यांचे पाल्य यांच्याकरिता ज्युनियर कॉलेज सुरू करणे, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणे, इत्यादी अनेक प्रकल्प विचाराधीन आहेत.[span_158](start_span)[span_158](end_span)
संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्यामुळे यावर्षी स्मरणिका प्रकाशन करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतला. हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत व्हावी. म्हणून आज मनाला समाधान आहे की, आमच्या सर्वच पालकांनी व विद्यार्थी यांनी आप-आपल्या परीने योगदान दिलेले आहे. त्याचबरोबर विविध बँका, वित्तीय संस्था, शिक्षण प्रेमी जनता, आमचे देणगीदार, आश्रय दाते आणि सदैव ज्ञानदेवतेची आराधना करणारे आमचे सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान सुद्धा फार मोठे आहे. प्रकल्प जरी अनेक असले तरी आपले सर्वांचे शिक्षण प्रेम आणि त्याकरिता आवश्यकतेप्रमाणे देण्यात येत असलेले आर्थिक योगदान, हे आम्हा सर्वांनाच अधिक स्फूर्ती देईल. हे सर्व प्रकल्प अधिक कार्यतत्परतेने पूर्ण करण्याचा निश्चितच आमचा मानस आहे. स्मरणिकेला आपण सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल संस्थेच्या वतीने अभिवादन ! स्मरणिका प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा ![span_159](end_span)
श्री. सहदेव शि. सावंत (कार्याध्यक्ष)[span_164](start_span)[span_164](end_span)[span_165](start_span)[span_165](end_span)
दिनांक ८ ऑक्टोंबर १९६२ रोजी कै. श्री.वि. ना.उर्फ भाऊ शिंदे यांनी मराठा समाजातील निवडक कार्यकर्ते घेऊन रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई या संस्थेची स्थापना केली. आताचा सिंधुदुर्ग जिल्हा त्यावेळी रत्नागिरीमध्ये समाविष्ट होता. उद्देश होता मराठा समाज बांधवांना एकत्र करणे व समाज उन्नतीला हातभार लावणे. समाज उन्नतीसाठी शिक्षण प्रसाराचे काम करावे असा विचार आला व शाळा सुरु करण्याचे ठरले.[span_166](start_span)[span_166](end_span)[span_167](start_span)[span_167](end_span)[span_168](start_span)[span_168](end_span)[span_169](start_span)[span_169](end_span)
कै. प्रभाकर विश्वासराव यांचे शिकवणी वर्ग सुरु होते. ती मुले घेऊन दि. २ ऑक्टोंबर १९६७ रोजी गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बाल विकास विद्या मंदिर शाळेची(जोगेश्वरी) येथे मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी संस्थेचे कार्याध्याक्ष कै.श्री.मधु मोरे होते. जोगेश्वरी (श्यामनगर) येथे चाळीमध्ये अल्पभाड्याने बालवर्ग सुरु झाला. पूर्व प्राथमिक विभागाच्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सौ. मंगला विष्णू शिंदे यांनी कार्यभार सांभाळला. शाळेला मान्यता मिळेपर्यत मुलांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून परीक्षेस बसविण्यात येत होते. सौ. वैशाली मुळ्ये या प्राथमिक विभागाच्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. त्यांनी गुणवत्ता व शिस्त या जोरावर शाळेला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. जोगेश्वरीतील पालकांनी प्राथमिक शाळेला उदंड प्रतिसाद दिला व माध्यमिक विभागाची मागणी केली. एव्हाना छोट्याशा चाळीतील खोलीचे एक मजली इमारतीत रुपांतर करण्यात संस्थेस यश आले. इ. ८ वी चे वर्ग सुरु झाले. कै.श्री. सुमन चोगले, एल.एल.बी..बी.एड. हे माध्यमिक विभागाचे पहिले मुख्याध्यापक झाले. चोगले सर हे संस्था व शाळा यांच्या प्रगतीसाठी झटू लागले. शाळा शिशुवर्ग ते दहावी पर्यंत दर्जेदार शिक्षण देवू लागली.[span_170](start_span)[span_170](end_span)[span_171](start_span)[span_171](end_span)[span_172](start_span)[span_172](end_span)[span_173](start_span)[span_173](end_span)
शाळेत शिक्षणाबरोबर कला, क्रीडा, सांस्कृतिक पर्यावरण इ. क्षेत्रात शाळेची मुले चमकू लागली. उपनगरामध्ये बालविकास विद्या मंदिरने आपला ठसा उमटविला. मुख्याध्यापक श्री. चोगले सरांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप मेहनत घेतली. एवढेच नाहीतर सरांनी निवृत्तीच्यावेळी मिळालेली सर्व रक्कम रु. ७,१४,५५१/- शाळेस देणगी दिली. त्यांच्या रकमेतून चोगले सभागृह बांधण्यात आले व शाळेला सभागृहाची मोठी सोय झाली. शाळा कै. सुमन चोगले यांची शतशः ऋणी आहे.[span_174](start_span)[span_174](end_span)[span_175](start_span)[span_175](end_span)[span_176](start_span)[span_176](end_span)[span_177](start_span)[span_177](end_span)
त्यानंतर डॉ. सौ. अपेक्षा खामकर मुख्याध्यापिका झाल्या. त्यांनी शाळेच्या सर्वागीण प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्याचबरोबर मुंबईच्या शिक्षणक्षेत्रात शाळेचे नाव केले.[span_178](start_span)[span_178](end_span)[span_179](start_span)[span_179](end_span)[span_180](start_span)[span_180](end_span)[span_181](start_span)[span_181](end_span)
विज्ञानप्रदर्शन, विविध स्पर्धामध्ये शाळेच्या मुलांना नेत्रदिपक यश मिळवून दिले. त्यांच्या कारकिर्दीत मयुरी कदम १० वी ला मराठी विभागातून मुंबईमध्ये पहिली आली व शाळेच्या यशात आपला एक मानाचा झेंडा रोवला गेला. त्यावेळी विद्यमान मुख्याध्यापिका सौ. नीला वर्तक ह्या मराठीच्या शिक्षिका होत्या. मयुरीच्या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाट आहे.[span_182](start_span)[span_182](end_span)[span_183](start_span)[span_183](end_span)[span_184](start_span)[span_184](end_span)[span_185](start_span)[span_185](end_span)
शाळेला विविध आंतरशालेय स्पर्धामध्ये नावलौकिक मिळाला. शालेय शिक्षणाबरोबर शाळेचे आधुनिक कॉमेट कॉम्प्युटर नावाने संगणक कक्ष आहे. शाळेमध्ये संगीताचे वर्ग, कराटे, शिक्षण दिले जाते. डान्स अकॅडमी आहे विविध खेळ शिकवले जातात. अंबिका योग कुटीरच्या माध्यमातून योग वर्ग, त्याचबरोबर एकाग्रता व श्वसन प्रकारासाठी ब्रह्मविद्या वर्ग चालवले जातात.[span_186](start_span)[span_186](end_span)[span_187](start_span)[span_187](end_span)[span_188](start_span)[span_188](end_span)[span_189](start_span)[span_189](end_span)
विद्यमान मुख्याध्यापक श्री जगदीश सूर्यवंशी हे दिनांक ०१/१२/२०२३ पासून मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या कार्यकीर्दीत मार्च २०२५ व मार्च २०२६ या दोन्ही वर्षी दहावीचा शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला यामुळे आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल बरोबर बाल विकास विद्यामंदिर यांनीही १००% दहावीचा निकाल लावण्याची परंपरा सुरू केली आहे त्याबद्दल मला मनस्वी आनंद वाटत आहे.[span_190](start_span)[span_190](end_span)[span_191](start_span)[span_191](end_span)[span_192](start_span)[span_192](end_span)[span_193](start_span)[span_193](end_span)
काळाची गरज लक्षात येऊन संस्थेने २००४ साली जोगेश्वरीतील पालकांच्या आग्रहाखातर आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल सुरू केले. या शाळेचा दहावीचा निकाल दरवर्षी १००% लागतो. या इंग्लिश स्कूलला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. व शाळा सर्व आघाडीवर प्रगती करत आहे.[span_194](start_span)[span_194](end_span)[span_195](start_span)[span_195](end_span)[span_196](start_span)[span_196](end_span)[span_197](start_span)[span_197](end_span)
संस्था सामाजिक क्षेत्रात आपले योगदान देत आहे. सभासदांचा मेळावा सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार, नैसर्गिक संकट काळात मुख्यमंत्री सहाय्यक निधीला देणगी इतर समाजोपयोगी कामे सातत्याने केली जातात. संस्थेने मराठा आरक्षण मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. मुंबईमध्ये मराठा आरक्षण संबंधी पहिली सभा आमच्याच रत्नसिंधु, मेघवाडी येथील सभागृहात झाली. आरक्षण प्रत्येक मोर्चात, आंदोलनात संस्थेला कार्यकर्त्यांनी हिरिरीने भाग घेतात. संस्थेने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात जे काम केले त्याची दखल देशपातळीवर घेतली गेली व अखिल मराठा फेडरेशनच्या वतीने संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब - महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दिनांक २५ ऑगस्ट,२०१९ रोजी गडकरी रंगायतन , ठाणे येथे संस्थेला मानचिन्ह देऊन संस्थेचा सत्कार करण्यात आला.[span_198](start_span)[span_198](end_span)[span_199](start_span)[span_199](end_span)[span_200](start_span)[span_200](end_span)[span_201](start_span)[span_201](end_span)
संस्थेने मुक्काम कोळंबे - रत्नागिरी येथे शैक्षणिक प्रकल्प उभारण्यासाठी तीन एकर जागा खरेदी केले आहे लवकरच या ठिकाणी शैक्षणिक प्रकल्पाचा शुभारंभ होईल.[span_202](start_span)[span_202](end_span)[span_203](start_span)[span_203](end_span)[span_204](start_span)[span_204](end_span)[span_205](start_span)[span_205](end_span)
अशाप्रकारे उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी संस्था व शाळा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. बाल विकास विद्या मंदिरच्या दर्जेदार शैक्षणिक कार्याची साठ वर्ष संस्थेच्या व सामाजिक कार्याची ६४ वर्षे पूर्ण करताना हा ज्ञानयज्ञ असाच अखंड सुरू राहणार आहे हिच आपली संस्थेच्या समाजाप्रती बांधिलकी.[span_206](start_span)[span_206](end_span)[span_207](start_span)[span_207](end_span)[span_208](start_span)[span_208](end_span)[span_209](start_span)[span_209](end_span)
सरचिटणीस, रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित | आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल मेंबर ऑफ द बोर्ड[span_212](start_span)[span_212](end_span)[span_213](start_span)[span_213](end_span)
सन १९६२ मध्ये काही दूरदृष्टी असलेल्या तरुणांनी समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीचा संकल्प करून या संस्थेची स्थापना केली. कै. विष्णू (भाऊ) नारायण शिंदे आणि कै. प्रभाकर राजाराम विश्वासराव (राव गुरुजी) यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली सुरू झालेला हा प्रवास आज समाजासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. मराठा समाज शिक्षणाच्या क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करू शकतो, हा विश्वास संस्थापकांनी कृतीतून सिद्ध केला. समाज बांधवांच्या सहकार्याने उभारलेली ही संस्था आज गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रभावी केंद्र बनली आहे.[span_214](start_span)[span_214](end_span)
रत्नागिरी जिल्हयातील मराठा तरुणांनी एकत्र येऊन जोगेश्वरी सारख्या मध्यम वर्गीय मराठी वस्तीत १९६२ मध्ये समाजाची संस्था काढायचा ध्यास घेतला. एका ध्येय याने वेडे झालेले हे तरुण ८ ऑक्टोबर, १९६२ रोजी कै. विष्णू (भाऊ) नारायण शिंदे आणि कै. प्रभाकर राजाराम विश्वासराव (राव गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था स्थापन करून मराठा समाजाचा उत्कर्ष करण्याची मुहूर्तमेढ रोवून वाटचाल करु लागले. मराठा समाज हा फक्त लढाई वा शेती हया क्षेत्रात वाकबगार नसून शैक्षणिक क्षेत्रात देखील यशस्वी होऊ शकतो हे निःसंशय मुंबईत दाखवून दिले. सुरुवात २५ पैसे ते जास्तीत जास्त ११.०० रुपये अशी वर्गणी रुपात गोळा करून अडचणींवर मात करून आजचे रुप संस्थेला प्राप्त करुन दिले, त्यांचे विनम्र अभिवादन [span_215](end_span)
ज्या उद्देशाने मराठी शाळेची स्थापना २३ ऑक्टोंबर १९६७ रोजी झाली. ती ५८ वर्षे सफल झाली. कारण स्थापनेपासून शालांत परीक्षेचा असा अविस्मरणीय १००% निकाल लागोपाठ २ वर्षे लागला व मराठी माध्यमाच्या शाळेने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला. त्याचप्रमाणे RJMDS English School देखील सातत्याने १००% निकाल देऊन संस्थेला प्रसिध्दी मिळवून देत आहे. यासाठी ज्यांनी ज्यांनी कठोर परिश्रम घेतले ते विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन समिती यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही यशस्वी वाटचाल शक्य झाली असून, या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो.[span_216](start_span)[span_216](end_span)[span_217](start_span)[span_217](end_span)
संस्थापकांना नक्कीच आनंद झाला असेल, त्याचप्रमाणे सर्व सभासद हितचिंतकांना देखील या संस्थेशी निगडित असल्याबद्दल अभिमान वाटत असेल. डिजिटल युगात संस्थेचे कार्य अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचावे आणि जगभरातील माजी विद्यार्थी, सभासद व हितचिंतक एकमेकांशी जोडले जावेत, आपली जगासोबत नाळ जोडण्यासाठी सदर अधिकृत संकेतस्थळ (Website) विकसित करण्यात आले आहे. नवयुगातील माध्यमांचा सर्व निगडित व्यक्तींनी लाभ घ्यावा आणि संस्थेच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या सूचना, सहकार्य आणि सहभागाचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.[span_218](start_span)[span_218](end_span)[span_219](start_span)[span_219](end_span)
संस्थापकांनी रुजविलेल्या मूल्यांचा आणि सामाजिक सेवेच्या परंपरेचा वारसा जपत, आगामी काळातही शिक्षण, संस्कार आणि समाजविकासासाठी समर्पितपणे कार्य करणे हीच आमची बांधिलकी आहे. छत्रपतींच्या रयतेच्या उत्कर्षाचा वारसा ही संस्था निर्विवादपणे ६४ वर्षे चालवत आली आहे आणि राहील यात शंका नाही.[span_220](start_span)[span_220](end_span)[span_221](start_span)[span_221](end_span)