संपर्क व देणगी सहकार्य

संस्थेच्या शैक्षणिक कार्यात सहभागी व्हा आणि आपल्या मौल्यवान सूचना आम्हाला कळवा

संस्थेचे नाव :- रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई

कार्यक्षेत्र : बृहन्मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व रायगड जिल्हे

पत्ता

रत्नसिंधु, मेघवाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई ४००० ६०.

आर्थिक योगदान व सहकार्य

विद्यार्थी विकास निधी व शैक्षणिक प्रकल्पांसाठी देणगी आवाहन

संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या 'विद्यार्थी विकास निधी' अंतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. तसेच संस्थेने मुक्काम कोळंबे (रत्नागिरी) येथे ३ एकर जागेवर शैक्षणिक संकुल उभारण्याचे कार्य हाती घेतले असून जोगेश्वरी येथे ज्युनियर कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचे प्रकल्प विचाराधीन आहेत.

प्रकल्प जरी अनेक असले तरी आपले सर्वांचे शिक्षण प्रेम आणि त्याकरिता आवश्यकतेप्रमाणे देण्यात येत असलेले आर्थिक योगदान, हे आम्हा सर्वांनाच अधिक स्फूर्ती देईल.

देणगी देण्यासाठी संपर्क:

देणगी धनादेश (Cheque) किंवा ऑनलाइन माध्यमातून देण्यासाठी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा:

+91 7021174260

संपर्क व सूचना फॉर्म

जगभरातील माजी विद्यार्थी, सभासद व हितचिंतक यांच्या सूचना, सहकार्य आणि सहभागाचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.